शेंदुर्णी । येथील गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञात महाविद्यालयात अमरावती येथील मिशन आयएएस स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मा.प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी ‘मी आयएएस अधिकारी होणारच’ या विषयावर विद्यार्थी व विद्यार्थीनींना केलेल्या आपल्या दोन तासाच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यामंध्ये स्पर्धा परीक्षाविषयी असलेली भिती व न्युनगंड घालवुन सकारात्मका जागृत करुन जोष भरतांना सोप्यात सोप्या पद्धतीने परीक्षा पद्धती व त्यातील बारकावे समजावुन सांगितले. स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा व सोबतच व्यक्तीमत्व विकास करा त्यासाठी प्रभावयुक्त संभाषण शैली आत्मसात करणे गरजेचे असुन विशिष्ठ विषयात व विशिष्ठ भाषेवर प्रभाव असल्यवरच आयएएस आणि आयपीएस होता येते अशी माहिती देत मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षा निवासी संस्कार शिबीरा विषयी दिली अधिका माहीती
कोणताही न्युनगंड न बाळगता आपल्या मातृभाषेत स्पर्धा परीक्षा देता येते व महिलांकरीता 33 टक्के जागा राखीव असतात. परीक्षेसाठी प्राथमिक परीक्षेत 5 ते 12वी अभ्यास क्रमावरील प्रश्न विचारले जातात तर मुख्य परीक्षेत पदवी अभ्यासक्रमावरील प्रश्न विचारले जात असुन मौखीक प्रश्नात 70 टक्के स्वत: विषयी प्रश्न विचारले जातात. दररोज 10 प्रश्न सोडविण्याचा सराव केल्यास 2000 प्रश्नाचा वर्षभरात सराव करता येतो व 180 प्रश्नाची मुख्य परीक्षा सहजासहजी देता येते परंतु त्यासाठी अभ्यासात सातत्य असणे जरुरी असल्याचे त्यांनी सांगीतले व उदाहरणा दाखल विश्वास नांगरे पाटील, भरत आंधळे यांच्या सारखी अनेक उदाहरणे देउन विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहीत केले. गरुड महाविद्यालयात लवकरच विनामुल्य मार्गदर्शन व अभ्यासीका सुरु करणार असल्याचे प्रा.डॉ.काठोळे यांनी घोषीत केले* ख-ड मिशनचे स्वप्नील आळेकर यांनी दरवर्षी अमरावती येथे विनामुल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व स्पर्धा परीक्षा निवासी संस्कार शिबीरा विषयी माहीती दिली. तसेच प्रा.डॉ. काठोळे स्पर्धा परीक्षार्थीसाठी राबवत असलेल्या उपक्रमाविषयी माहीती देउन त्याचा विदयार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात यांची उपस्थिती
यावेळी प्रा.डॉ.काठोळे व विद्या काठोळे यांचा सत्कार कार्यक्रमांचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.व्ही.आर.पाटील तसेच प्रमुख अतिथी स्वप्नील आळेकर व माजी उपसरपंच अविनाश निकम यांचाही सत्कार कार्यक्रम प्रमुख प्रा.देशमुख तर शेंदुर्णी पत्रकार संघाचे उपक्रमाबद्दल अध्यक्ष विलास अहिरे यांचा सत्कार प्रा.डॉ.काठोळे यांनी केला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शाम साळुंखे यांनी तर आभार प्रा.जिवराग यांनी मानले यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी पुण्याहुन आलेले दोन परीक्षार्थी परीसरातील 500 विदयार्थ्यांनी लाभ घेतला.