कासोदा । येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मनमानी कारभाराविरोधात योगेश चौधरी या अपंग युवकाने 26 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु केले. सेंट्रल बँकेचे शाखा प्रबंधक यांना निवेदनाद्वारे त्यांनी विविध मागण्या केल्या आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रमुख मागण्या – सेंट्रल बँक ही दुसर्या मजल्यावर असल्याने अपंग, वृद्ध यांना त्रास सहन करावा लागतो त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, बँकेत कोणतेही दलाल, एजंट व बीसीबी एक या पदावर कोणी ही व्यक्ती नसावी, कर्मचारी संख्या वाढवावी, कायमस्वरूपी दोन काऊंटर सुरु करावे, कर्मचारी खातेदारांशी उर्मटपणाने वागतात त्यांना योग्य ती समज द्यावी, खातेदारांना होणारा त्रास म्हणजे प्रिटींग मशिन बंद असते. बँकेने दोन ते तीन वर्षात ज्या ज्या खातेदारांना कर्जप्रकरण दिले त्यांचे रितसर चौकशी करण्यात यावी, बँकेत सेक्युरिटी गार्डची नेमणूक करावी, पूर्वीचे सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी यांच्याबद्दल माझी जी तक्रार आहे. त्यात कोणी हस्तक्षेप करू नये, बँकेतील सी.सी.टीव्ही. फुटेज चेक करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहे.