48 तासात मान्सून केरळात

0

पुणे : पुढील 48 तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्यानं दिली आहे. महाराष्ट्रातही 2 ते 3 जून दरम्यान पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशभरात मान्सूनच्या वाटेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदमानात दाखल झालेला पाऊस लवकरच देशात येईल, याविषयी अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र आता मान्सून येत्या 48 तासात केरळात दाखल होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून केरळमार्गे देशात आणि राज्यात येईल. मान्सूनची चाहूल लागल्याने शेतकर्‍यांचीही लगबग सुरू झाली आहे.