इंग्लंडने 7 धावांनी ट्वेन्टी-20 त भारताला केले पराभूत

0

कानपूर । इंग्लंड संघा सध्याल भारताच्या दौर्‍यावर आहे. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात कसोटी व एकदिवसीय मालिका खिशात घातली. मालिका जिकल्याने आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय संघाला 26 जानेवारी झालेल्या कानपूर येथील सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

कापनूरच्या ग्रीन पार्क र्स्टडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे टि-20त मालिकेत इंग्लंडने 1-0ने आघाडी घेतली आहे.भारताने 20 षटकात 147 धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले होते. इंग्लंडने हे आव्हान 18.1 षटके व 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. सलामी फलंदाज सॅज्ञ बिलिंग्स (22), जेसन रॉय (19) यांनी अवघ्या 20 चेंडूत 42 धावा काढून इंग्लंड संघाला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्याच्यानंतर आलेल्या कर्णधार इयान मॉर्गन व ज्यो रूट या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. मॉर्गनने अर्धशतक झळकावले. तर रूट 46 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या टी-टवेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजयी सलामी देत 1 ने आघाडी घेतली आहे.

सामनावीराचा पुरस्कार मोईन अलीला
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ट्वेन्टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले होते सलामीसाठी यावेळी कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला होता. कोहली आणि केएल राहुल 34 धावांची भागीदारी केली होती. राहुल(9) झेलबाद झाला. त्यानंतर पण इंग्लंडने मोईन अलीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. मोईन अलीच्या पहिल्याच चेंडूवर कोहली (29) झेलबाद होऊन माघारी परतला. युवराज केवळ 12 धावा करून बाद झाला. चेंडूवर तो क्लीनबोल्ड देखील झाला. हुशारीने गोलंदाजी करत धोनीच्या फटकेबाजीला रोखून धरले. हार्दिक पंड्या देखील झेलबाद झाला. अखेरच्या षटकात धोनीने लागोपाठ दोन चौकार ठोकले इंग्लंडकडून कर्णधार इऑन मॉर्गन याने अर्धशतकी खेळी साकारली, तर जो रुटने नाबाद 46 धावांची खेळी साकारून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मग युजवेंद्र चहल पहिल्याच षटकात दोघांनाही त्रिफळाचीत करून भारताला यश मिळवून दिले. बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीनबोल्ड झाला होता. पण चेंडू नोबॉल असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे रुटला जीवनदान मिळाले होते. इंग्लंडकडून चार षटकात 21 धावा देऊन दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेणा़र्‍या मोईन अली याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.