एअरगन पिस्तुलासह एक तरुण गजाआड

0

कल्याण : खडकपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक संदीप बर्वे अँटी रॉबरी स्कॉडमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसंत व्हॅली, वृंदावन गार्डन परिसरात गस्ती घालत होते. त्यावेळी एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एअरगन आढळून आली. पोलिसानी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेत एअरगन जप्त केली आहे. हिमांशू कापसे असे या तरुणाचे नाव असून त्याने ही एयरगन कुठून व का आणली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.