समाज सहभागातून भापट शाळा झाली डिजिटल

0

म्हसळा : म्हसळा तालुक्यांतील अतिशय दुर्गम व डोंगराळ भागातील रायगड जिल्हा परिषदेची भापट शाळा समाज सहभागातून डिजिटल झाली आहे. या शाळेचा लोकार्पण सोहळा सभापती उज्वला सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपसभापती मधुकर गायकर, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे, संदिप चाचले, गटविकास अधिकारी नीलम गाडे, अनिल बसवत, सरपंच राजाराम तिलटकर, दिलीप मांडवकर, व्यवस्थापन समिती अध्यक्षा भाविका जोशी, नथुराम घडशी, परिमंडल वनअधिकारी बाळकृष्ण गोरनाक, वनपाल सुर्यतळ, खालिद भाई सिद्दीकी, कासिम मेंमन, पोलिस पाटिल मुखतार नजीर, योगेश पाटिल, शैलेश पाटिल, रविंद्र कुवांरे, गाव अध्यक्ष प्रविण ठोम्बरे, सुनील सोलकर, समीर दिवेकर, चंद्रकांत पवार, मुख्याध्यापिका सविता चव्हाण, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि महिला मंडल मोठ्या संखेने उपस्थित होते.