49 विद्यार्थ्यांनी मारल्या 1 हजार 49 दशरंग उड्या

0

वरणगाव। महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय मल्लखांब संघटनेच्या वतीने जागतीक मल्लखांब दिनी 49 विद्यार्थ्यांनी 1 हजार 49 दशरंग उड्या मारुन साजरा केला.

यावेळी शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे, प्राचार्य आर.आर. निकुंभ, उपमुख्याध्यापक जी.टी. बढे, पर्यवेक्षक आर.एच. चौधरी, गणेश चौधरी, क्रीडा शिक्षक जयंत जोशी, लक्ष्मीकांत नेमाडे आदी
उपस्थित होते.

अभ्यासासोबत खेळाला प्राधान्य द्यावे
सातबारा अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत बढे म्हणाले की, मल्लखांब हा खेळ भारतातील पुरातन खेळ आहे. या खेळामुळे शरीर लवकचीक व बळकट होते. तसेच शरीराला व्याधी लागत नाही. मन व शरीर तंदुरूस्त राहते. अभ्यासासोबतच अशा खेळांकडे लक्ष दिल्यास शरीर देखील तंदुरूस्त रहाते. खेळातील यशामुळे भविष्यात विविध सवलतीचे गुण मिळणे, नोकर्‍यामधील संधी उपलब्ध होत असतात. याकरीता विद्यर्थ्यांनी मल्लखांब खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन सचिन चौधरी यांनी तर आभार आदर्श माळी यांनी मानले.

खेळाच्या इतिहासाबद्दल मार्गदर्शन
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हनुमंताच्या प्रतिमेला नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी क्रीडा शिक्षक जयंत जोशी यांनी मल्लखांब या खेळाचा प्राचिन इतिहास व ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली. तसेच याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे मने जिकुंन घेतले. तसेच 49 विद्यार्थ्यांनी 1 हजार 49 दशरंग उड्या मारुन हा दिवस साजरा केला.