महाविज वितरण कंपनीविरोधात नवापूर विकास आघाडीतर्फे निवेदन

0

नवापूर । महाविज वितरण कंपनीचे तक्रार निवारण केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात करा अन्यथा बेंमुदत सत्याग्रह करण्याचा इशारा नवापूर विकास आघाडीतर्फे देण्यात आला. नवापूर विकास आघाडीच्या वतीने 31 जुलै रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रति पोलीस निरीक्षक आणि उपअभियंता महा वीज वितरण यांना निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा देण्यात आला. येत्या 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी 15 दिवसाच्या आत महावीज वितरण कंपनीने कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी न आणल्यास 15 ऑगष्ट्र रोजी तहसील कार्यालय समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार, उपअभियंता वीज वितरण कंपनी यांना देण्यात आलेला आहे. निवेदनावर आघाडीचे अध्यक्ष संदीप पारेख, सचिव मंगेश येवले, सल्लागार धर्मेंद्र पाटील कोषाध्यक्ष एडव्होकेट नितीन देसाई यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

निवेदनात या आहेत मागण्या
मागील दोन ते तीन वर्षा पासून महावीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारानी नागरिक त्रस्त झाले असून मीटर रिडींग घेणे, बिल वाटप करणे हे काम खाजगी ठेकेदारा कडून घेतले जात आहेत. परंतु सबंधित ठेकेदार नियमित मिटर रिडींग न घेता फॉल्टी मीटर असल्याचे दाखवून आवाजवी बिले दिले जात असल्याने संपुर्ण तालुक्यातील व शहरातील नागरिकांना बिले दुरुस्तीसाठी 1 किलो मीटरअंतर असलेल्या कार्यलयात जावे लागते, परंतु कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अभाव, शहरापासून लांब अंतरावर कार्यालय असल्याने इंटरनेट सेवा कनेक्टिव्हिटी (संम्पर्क) मिळत नाही. त्यामुळे एकाच वेळेत बिले दुरुस्ती होत नसल्याने नागरिकाना येण्याजाण्या साठी नाहक हेलपाटे खावे लागत आहेत प्रत्येक महिन्याला वेळेवर बिले न वाटणे फॉल्टी मीटर असल्याचे दाखवत अवाजवी बिल देणे. यासाठी नागरिकांना तक्रार करण्यासाठी 1 किमी अंतरावर असल्याने अपघाताची शक्यता असते.