मसाला कंपनीत चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । एमआयडीसीतील लाल स्पाइस या मसाल्याच्या कंपनीतून शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान 22 हजार रुपये किमतीच्या सहा गोण्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दहा तासात एका संशयिताला अटक केली. त्याला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 2 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. एमआयडीतील एफ सेक्टरमधील प्लॉट क्रमांक 26 मधील लाल स्पाइस कंपनीतून शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान चार गोण्या लाल मिरची आणि 2 गोण्या धना पावडरची अशा एकूण 22 हजार रुपयांचा ऐवजाची चोरी झाली होती. कंपनी सुरू असताना चोरी झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. या प्रकरणी कंपनीचे योगेश देविदास वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रामकृष्ण पाटील, नितीन बाविस्कर, हेमंत कळसकर यांना तपासासाठी पाठविले होते.

लंच टाइममध्ये केली चोरी…
कंपनी सुरू असताना सर्व कर्मचार्‍यांसमोर चोरी करणारा कंपनीतीलच कर्मचारी असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे दुपारनंतर कंपनीत कोण आलेला नाही? त्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्यावेळी कंपनीच्या टेम्पोचे चालक अंबादास दिनकर सत्रे(वय 26, मूळ रा. आलनवाडी, जि. अहमदनगर, ह. मु. खुबचंद साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी), उत्तम मधुकर सुवे (रा. कुसुंबा) हे दोघे चोरी झाल्यानंतर कंपनीत दिसलेच नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने खुबचंद साहित्या कॉलनीतून अंबादास याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता. त्याने उत्तर सुवेच्या मदतीने चोरीच केल्याची कबुली दिली. कंपनीत दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान जेवणाची सुटी असते. त्यावेळी भिंतीजवळ ठेवलेल्या चार मिरची पावडरच्या आणि 2 धने पावडरच्या गोण्या भिंती पलीकडे फेकून दिल्या. त्यानंतर बाजुला उभ्या असलेल्या उत्तम सुवे याने त्या गोण्या टेम्पोत टाकून दोघे पसार झाले. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास अंबादास याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला शनिवारी न्यायाधीश खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 30 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

कार चोरट्याला अटक; 31 पर्यंत पोलीस कोठडी
जळगाव । शहरातून कार चोरून अमरावतीत घरफोड्या करणार्‍या दोन चोरट्यांना जिल्हापेठ पोालिसांनी 24 जानेवारी रोजी अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यात घेतले होते. त्यांचा आणखी एक साथीदाराला शुक्रवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऑक्टोंबर महिन्यात केली होती चोरी
जळगाव शहरातील द्रौपदीनगर भागातून 24 ऑक्टोबर 2016 रोजी रात्री जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका विभाग) अनिकेत मानोरकर यांची कार (क्रमांक एमएच-19, बीयू-9795) तर 21 डिसेंबर रोजी निवृत्तीनगरातील राजकुमार राजेंद्र जैन (वय 33, रा. निवृत्तीनगर) यांची कार (क्र. एमएच-34-एफ-2332) चोरीला गेली होती. अमरावती ग्रामीण एलसीबीच्या पथकाने 15 जानेवारी रोजी शशिकांत मारोती बागळे, पवन रामदास आर्या यांना अटक केली होती. त्यांच्या जवळ जैन यांची कार हस्तगत केली होती. तर या चोरीत त्यांचा तिसरा साथीदार राजा उर्फ राजेश बाजीराव याला पो.उपनि. गजानन राठोड, महेंद्र बागूल यांनी ताब्यात घेतले.