दवाखान्यासमोरून मोटारसायकल लंपास

0

चाळीसगाव । दवाखान्यात नातेवाईकांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील आडगाव येथील इसमाची मोटारसायकल शहरातील दुध सागर मार्गावरील दवाखान्या बाहेरून अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना शनिवार 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 ते 7:45 वाजेच्या दरम्यान घडली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
दुधसागर मार्गावरील डॉ. एम.बी.परदेशी यांच्या रूग्णालयात अ‍ॅडमीट असलेल्या रूग्णास आडगाव येथील शेतकरी संचज जगन्नाथ पाटील हे जेवणाचा डबा देण्यासाठी 7 जानेवारी रोजी आले होते. ते वीस हजार रुपये किमतीची एम.एच.-19, ए.डब्ल्यु. 8159 बजाज प्लॅटीना मोटार सायकल दवाखान्याच्या बाहेर लावून आत गेले . जेवणाचा डबा देऊन बाहेर आल्यानंतर त्यांची मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबविल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल चा सगळीकडे शोध घेतला.

त्यांनी मोटारसायकलीचा सर्वत्र शोध घेवूनही मात्र मिळून न आल्याने शुक्रवारी 27 जानेवारी रोजी सायंकाळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद नोंदविली. चाळीसगाव पोलिीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात भाग 5 गु.र.नं. 12/2017 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक अरूण पाटील करीत आहे.