नागपूर : आपल्या देशातील गृहणी ह्या आजही स्वयंपाक चुल्यावर किवा स्टोव्हवर करतात. या धुरामुळे 8 टक्के महिलांचे मृत्यू होतो. यावर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना मृत्यूपासून वाचविणारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने येत्या अडीच-तीन वर्षात 5 कोटी महिलांना उज्ज्वला योगनेतर्गत गॅस कनेक्शन वाटप केले जाणार आहे.
देशाच्या इतिहासात एक कोटी नागरिकांनी घरगुती सबसीडी सोडल्याचे प्रथमच घडले असून या पैशातून गरिबाच्या घरात गॅस कनेक्शन देण्याची योजना प्रधानमंत्र्यांनी राबविली आहे. या योजनेअंतर्गत दीड कोटी लोकांना एलपीजी गॅस मिळाले आहेत. पुढील अडीच ते तीन वर्षात ही संख्या 5 कोटीवर पोहचलेली असेल, असे मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस म्हणाले,प्रशासनाच्या पुढाकाराने नरखेड तालुका केरोसिन मुक्त झाला असून महाराष्ट्र केरोसिनमुक्त करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपजी वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान, देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.