नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी आज शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकजुटीने सरकारचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले. येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी मोदींनी रात्री 9 वाजता देशवासियांकडून 9 मिनिटे मागितले आहे. रात्री 9 वाजता घरातील सगळे दिवे बंद करून फक्त मेणबत्ती, मोबाईलचा टॉर्च, बॅटरीचा प्रकाश कराव, यातून दिव्य शक्तीचा जागर होईल आणि अंतरशक्तीला ऊर्जा मिळेल असे मोदीनी सांगितले.
यापूर्वी मोदींनी कोरोनाशी लढणाऱ्याच्या सन्मानार्थ घंटानाद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता मोदींनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता दिवे लावून प्रकाशाच्या दिव्यत्वाची जाणीव करून देण्याचे आवाहन केले आहे.
130 कोटी जनतेने प्रकाशाची दिव्य शक्ती दाखवून द्यावी. दिवा लावतांना आपण एकटे नाही याची प्रत्येकानेजाणीव ठेवावी, आज सगळे घरात आहेत, त्यामुळे त्यांना एकटे असल्याची जाणीव होते आहे. मात्र या देशात कोणीही एकटा नाही, 130 कोटी जनता पाठीशी आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.