5 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

0

इंदापूर : तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी व सहायक निवडणूक अधिकारी दामोदर राठोड यांनी दिली.

लुमेवाडी, शिरसाटवाडी, अवसरी, भाटनिमगाव, निर निमगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निवडणुकीचे नोटीस (दि.25) रोजी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास 4 फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत सोमवार ते शनिवार यादिवशी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 11 फेब्रुवारीला होणार आहे. इंदापूरचे तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 13 फेब्रुवारीपर्यंत दुपारी तीनपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह 13 फेब्रुवारीला दुपारी देण्यात येईल. मतदान रविवार 24 फेब्रुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत होणार आहे मतमोजणी 25 फेब्रुवारी रोजी इंदापूर येथील नवीन तहसीलदार कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती तहसीलदार मेटकरी यांनी दिली.