पुणे : रात्रीच्या वेळी वाहने जाळणार्यांमुळे दहशत पसरविणार्यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास दुचाकी जळाल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यवस्तीतील कसबा पेठेत रस्त्यावर उभ्या असणार्या पाच दुचाकी मंगळवारी पहाटे अज्ञाताने जाळल्या. पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या या दुचाकी जाळल्याने सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण होत आहेत. कसबा पेठेतील माळवदकर गल्लीतील एका रस्त्यावर पाच दुचाकी उभ्या करण्यात आल्या होत्या. या दुचाकींना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली.
यामध्ये पाचही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेनंतर कसबा पेठेतील अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. काही मिनिटांतच जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.