पुणे । नव्याने उदयाला येत असलेल्या या ‘फ्लेक्स संस्कृती’त विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांनी मात्र सामाजिक भान ठेवून आपला वाढदिवस साजरा केला. महापालिकेच्या दळवी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या पंचवीस गर्भवती महिला आणि पाच बालकांचा भोसले यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले व मुलगी देविका काकडे यांच्या हस्ते विमा पॉलिसीची कागदपत्रे देण्यात आली. प्रसूतीनंतर नव्वद दिवसांनी ही विमा पॉलिसी जन्मलेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावे होणार आहे. त्यांना वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच त्यानंतर एक लाख रुपयांची रक्कमही मिळणार आहे.
यावेळी बसंत मिश्रा, प्रसाद मिश्रा, राखी रजपूत उपस्थित होते. नरवीर तानाजी तरुण मंडळ, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरी संघ, नरवीर ग्रुप, कट्टा ग्रुप, वीर चाफेकर तरुण मित्र मंडळ, श्रीकष्ण मित्र मंडळ व गोली ग्रुप यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नरवीर तानाजीवाडी येथील विद्यामंदिर, संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा क्रमांक 119 व 61 जी, तसेच 61 मुलींची शाळा, खैरेवाडी येथील दादासाहेब थोपटे शाळा क्रमांक 57 या शाळांमधील 1350 विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आबा भोसले, हिरालाल कासट, बाळा दारवटकर, गोपाळ देशमुख, विजय आल्हाट, मलंग सय्यद, धमंजय धाकतोडे, सुनील माळी, बाबा हेंद्रे, गणेश जाधव, अमित पाचुंदकर, रोहिणी वाघ, मनीषा देशमुख, युवराज चिंचणे आदी उपस्थित होते.