मुंबई । राज यांच्या फेसबुक पेजला पाच लाखांवर लाइक्स मिळाले असून लोकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक हे उत्तम माध्यम आहे, अशी पावती देत राज ठाकरे यांनी फेसबुक पेज थाटामाटात सुरू केले. या पेजच्या उदघाटनाच्या भाषणात राज यांनी भाजप आणि दाऊद कनेक्शनचा सनसनाटी आरोप केला. हा कार्यक्रम लाइव्ह होता आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
आठवड्यातून दोन व्यंगचित्रे राज आपल्या फेसबुक पेजवर शेअर करणार आहेत. त्याचबरोबर आपली ममन की बातफही ते या पेजवर शेअर करणार आहेत. त्यामुळे राज समर्थकांसाठी संवादाचे नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून या फेसबुकच्या माध्यमातून राज यांचा फेसबुकवरील लोकप्रियतेचा राजकारणात त्यांना किती फायदा मिळतो, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.