5 संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवागनी

0

जळगाव : शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारात असलेल्या जनकल्याण समितीच्या भोजन वाटप कक्षाजवळील सुकलेल्या झाडाची फांदी अचानक कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने तर संतप्त जमावाने जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनाची तोडफोड केली होती. याप्रकरणी गुरूवारी अटक केलेल्या पाचही संशयितांना शुक्रवारी न्या. रा.शा.भाकरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पाचही संशयितांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

संशयितांना न्यायालयात केले हजर
संगिता प्रविण सोनवणे (वय 32) रा.तुकाराम वाडी यांच्या डोक्यावर सुकलेल्या झाडाची फांदी त्यांच्या कोसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने आराडाओरड करीत जिल्हा शल्यचिकीत्सक भामरे यांची कॅबीनची तोडफोड केली. खुर्च्या, टेलीफोन, टेबल इतर मशीनची नासधूस केली होती. या तोडफोडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी विक्की शंकर चौधरी व नितीन राजेंद्र चौधरी या संशयितांना दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. तर गुरूवारी सायंकाळी ईश्‍वर रामप्रसाद परदेशी, चंद्रकांत ज्ञानेश्‍वर पाटील, अजय अरूण मराठे, नितीन राजू माळी, गणेश जितेंद्र भावसार सर्व रा. तुकारामवाडी या पाच संशयितांना अटक केली होती.