वेद अनुष्ठान अन् सेवेसाठी जळगावचे ५ पुरोहित अयोध्येला खाना

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५ पुरोहितांना १५ दिवसांसाठी अयोध्येत अनुष्ठान अन् सेवेची संधी

जळगाव प्रतिनिधी ।

जळगाव जिल्ह्यातील ५ पुरोहित १५ दिवसांचे आणि सेवा देण्यासाठी गुरुवारी, ४ मे रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे रवाना झाले. त्यात जळगाव येथून अविकुमार जोशी, मौक्तिक शुक्ल, संजय नाईक, वासुदेव पुराणिक तसेच चाळीसगाव येथील दिलीप दत्तात्रय जोशी यांचा समावेश आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अनुमतीने पुणे येथील सद्गुरू ग्रुप आयोजित वेद अनुष्ठान आणि सेवा योजना अयोध्या अंतर्गत हा उपक्रम संस्था अध्यक्ष यशवंत कुळकर्णी व सचिव धनंजय घाटे संचलित करीत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५ पुरोहितांना १५ दिवसांसाठी अयोध्येत अनुष्ठान व सेवेची संधी प्राप्त करून देण्यात येत आहे. हा उपक्रम २ वर्षे चालणार आहे.

वेद.शा. सं. अशोक साखरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने मंगळवारी महाबळमधील रामदास स्वामी मंदिरात दर्शन घेऊन ५ ही पुरोहित अयोध्येस रवाना झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुकुंद शुक्ल, शामकांत नाईक, वसंत देखणे, श्रद्धा शुक्ल, राजश्री जोशी, स्वाती नाईक आदी उपस्थित होते. त्यांना ही संधी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना रवाना केले आहे.