जळगाव। वाहतुक नियमांचे उल्लंघटन करणार्या 50 वर रिक्षाचालकांवर शनिवारी शहर वाहतुक शाखेच्या पथकाने दंडात्मकक कारवाई केली. वाहतुक नियमांचे उल्लंघटन करणे, ड्रेस कोड न वापरने, फ्रंट शिट बसविणे, यासाठी नविन बस स्थानकासमोर आज रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
यात प्रत्येकी 200 रूपयें दंड करून रिक्षा चालकांना सोडण्यात आले. रिक्षा चालकांना वारंवार सुचना करून देखिल वाहतुक नियमांचे उल्लंघटन होत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे़ या पुढे देखिल ही कारवाईं सुरू राहणार असल्याचे पो.नि देशमुख यांनी सांगितले आहे.