अमळनेर : बंद घरांना टार्गेट केल्यानंतर चोरट्यांनी किराणा दुकानाला टार्गेट करीत 45 हजार 800 रुपयांचा किराणा माल चोरून नेला. ही घटना अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसात गुन्हा
भंवरलाल पुरखाराम चौधरी (36, सावखेडा, ता.अमळनेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून गावातील बसस्थानकाजवळ त्यांचे किराणा दुकान आहे. सोमवार, 18 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता त्यांनी किराणा दुकान बंद करून घर गाठले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत किराणा दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकावून आत प्रवेश करत दुकानातील किराणा सामान व रोकड मिळून 45 हजार रुपये 800 रुपये किंमतीचा सामान लांबवला. मंगळवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी भवरलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.