50 एसआरए प्रकल्पांना फायदा

0

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी शहरात सुरू असलेल्या सुमारे 50 एसआरए प्रकल्पांना त्याचा फायदा मिळणार आहे.

राज्य सरकारकडून जानेवारी 2018मध्ये एसआरएसाठी प्रोत्साहनपर नियमावलीचे प्रारूप लागू करण्यात आले. त्यात ‘एफएसआय’मध्ये वाढ होण्याऐवजी आणखी कपात झाली. नियमावलीत बदल करीत अंतिम नियमावली लागू केली. त्यामध्ये तीनपर्यंत ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरू असलेल्या एसआरएच्या बांधकाम प्रकल्पांनादेखील तो लागू करण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे 2014 च्या नियमावली नुसार जे प्रकल्प मंजूर झाले आहे, परंतु पूर्ण झालेले नाहीत अशा बांधकामांना फेरप्रस्ताव दाखल करून फायदा घेता येईल.