रावेर । कृषी संजीवनी योजना फसवी असून त्यात शेतकर्यांच्या विज बिलाचे दंड व व्याजच माफ केले जात आहे. त्याऐवजी विज बिलात 50 टक्के सूट द्यावी तसेच एकाच हॉर्सपॉवर मोटरचे समान बिल मिळण्याची मागणी शेतकर्यांनी आज नायब तहसीलदार सी.एच. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य योगेश पाटील, खिरवड सरपंच निळकंठ चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, संभाजी बिग्रेट तालुकाध्यक्ष विलास ताठे, जिजाबराव पाटील, विनोद चौधरी, राजेंद्र चौधरी, डी.डी. वाणी, यांच्यासह खिरवळ, नेहते, दोधे, मोरगांव, अजनाड, धुरखेडा व परिसरातील शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.