भिगवण । इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून 50 लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. भिगवण पोलिसांनी पकडला. बंदी असतानाही एका टॅम्पोमधून चोरून विक्रीसाठी गुटखा आणला जात होता. भिगवण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी टॅम्पोची झाडाझडती घेतली.
यावेळी या टॅम्पोत 50 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा गुटखा मिळून आला. अन्न व भेसळ पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. गुटख्यावर बंदी असली तरी शौकिनांकडून त्याला दुप्पट-तिप्पट किंमत मिळत असल्याने त्याची चोरून विक्री सुरू आहे. गुटखा विक्रीचे रॅकेट सक्रीय असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे.