50 हजारांच्या पाकिटावर चोरट्याने हात केला साफ

0

भुसावळ बसस्थानकात चोर्‍या वाढल्या ; अकोला-अमळनेर बसमधील प्रकार

भुसावळ– गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अकोला-अमळनेर बसमधील प्रवासी स्वप्नील पाटील (रावेर) यांचे पाकिट लांबवले. त्यात 50 हजारांची रोकड होती. ही घटना शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे भुसावळ ते जळगाव प्रवास करीत असताना बसमध्ये गर्दी असताना चोरट्याने संधी साधली. पाकिटात 50 हजारांच्या रोकडसह आधारकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना आदी कागदपत्रे होती.