जळगाव । मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून 50 हजार रूपयांसाठी पिंप्राळा येथे राहणार्या 31 वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रामानंद पोलीसात पतीसह इतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता ही 31 वर्षीय असून पिंप्राळा येथील नाझीयाबी इरफानोद्दीन सैय्यद (वय-31, रा.सिंधी वस्ती, सलिम प्रकाश टॉकी बर्हाणपूर ह.मु.प्रिंप्राळा, हुडको या महिलेच्या फियादीवरुन सासू, दीर,दिरानी यांच्याकडून महिलेचा शारारीक व मानसिक छळ केला जात असून वारंवार मारहाण केली जात आहे. म्हणून इरफानोद्दीन इसानोद्दीन सैय्यद, सासू सद्दरबी इसानोद्दिन सैय्यद, दीर इलियासोद्दिन इसानोद्दिन सैय्यद, दीराणी निलोफर इलियासोद्दीन सैय्यद, दीरानीचा भाऊ रईस रुखमान अली यांनी मोटारसायकल घेण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी महिले कडे केली़ तसेच या पैशांसाठी वेळो वेळी मारहाण करुन तलाकची धमकी महिलेला दिली. म्हणून महिलेने रामानंद नगर पोलिसात पाच जणांविरुध्द छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.कॉ. अरूण पाटील करीत आहे.