500 रूपयांची लाच घेताना खरेदी पर्यवेक्षकास अटक

0

शहादा । येथील नगरपालिकेत रेकार्डरूममधील सुभाष दौलत मराठे (सहायक खरेदी पर्यवेक्षक) याला बांधकाम परवानगी संदर्भात मंजुर असलेल्या नकाशाची मुळप्रत देण्यासाठी तक्रारदाराकडून 500 रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.मुळ तक्रारदार शहरातील प्लॉट क्रमांक 71 चे बांधकाम संदर्भात 17/7/1998 अन्वये मंजुर करण्यात आले होते. त्यासाठी पुर्वी असलेला प्रशासनाचा मंजुर नकाशा हवा होता त्यासाठी सुभाष मराठे यांनी 500 रूपयाची मागणी केली होती. तक्रारदार याने नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी अधिकार्‍यांशी संपर्क साधला. पोलिस उपायुक्त डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली एस.टी.जाधव (पोलिस उपअधिक्षक नंदुरबार) यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह सापळा रचून रंगेहाथ पकडून कारवाई केली. सुभाष मराठे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.