नवी दिल्ली । देशभरात लागू केलेल्या नोटाबंदीनंतर देश पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या वापराला सरावत असतानाच आता पुन्हा एकदा पाचशे रुपयाची नवी नोट चलनात येणार आहे. भारतील रिझर्व्ह बँकेने पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पाचशेच्या या नव्या नोटेची माहिती देणारे एक ट्विट आरबीआयचे गर्व्हनर डॉ. उर्जित पटेल यांनी काल रात्री उशीरा केले होते. त्यानुसार, या नव्या नोटांमध्ये केवळ एका अक्षराचा बदल करण्यात आला आहे.
कशी असेल नवी नोट?
भारतीय चलनातील पाचशे रुपयांच्या आधीच्या नोटांवरील नंबर पॅनलमध्ये ए हे इंग्रजी अक्षर आहे. मात्र आता त्याजागी अ हे इंग्रजी अक्षर असलेली नवी बॅच चलनात दाखल झाली आहे. नोटांचा सीरिअल नंबरच्या सुरुवातीच्या तीन अंकांनंतर एक छोटी जागा रिकामी ठेवण्यात आली असून त्यानंतर सहा अंक आहेत. जिथे रिकामी जागा आहे, त्यामध्ये एक इंग्रजी अक्षर आहे. त्याला इन्सेट लेटर असे म्हणतात. यापूर्वी ए किंवा ङ ही अक्षरे असायची. आता नव्या नोटांमध्ये इन्सेट लेटर अ असे लिहिलेले असणार आहे. मुख्य म्हणजे पाचशेच्या या नव्या नोटांच्या डिझाइनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डॉ. उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या या नव्या नोटांची छपाई 2017 या आर्थिक वर्षात करण्यात आलेली आहे.
पाचशेची जुनी नोट कायम
दरम्यान, पाचशेच्या या नव्या नोटांमुळे सध्या चलनात असलेली पाचशेची नोट कायम राहणार आहे. भारतीय रिर्झव्ह बँकेने नव्याने आणलेल्या पाचशेच्या नवीन नोटेमुळे जुन्या नोटांवर त्याचा कोणाताही परिणाम होणार नाही, असेही रिर्झव्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.