नवापूर । रक्तदान करुन संताची पुण्यतिथि साजरी करणेे म्हणजे संताच्या विचारांचे आचरण होय. अन्नदान , रक्तदान आणि अवयवदान हे तिन दान सर्व श्रेष्ठ दान आहेत आणि ही आजच्या काळाची गरज आहे . संताची जयंती पुण्यतिथी अशाच सामाजिक उपक्रमातुन साजरी झाली पाहिजे असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी नवापूर येथील श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेतर्फे श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले.
या प्रसंगी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरिशकुमार नाईक, नगराध्यक्षा रेणुकाताई गावित , तहसिलदार प्रमोद वसावे, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, दिलीप बुवा, माजी नगरसेवक विनय गावीत, पोलिस उपनिरीक्षक संतोस भंडारे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख हंसमुख पाटील, तालुका प्रमुख गणेश वडनेरे,दैनिक पञकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते संतसेना महाराज व् शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यारा येथील जनकल्याण रक्तपेढ़ी च्या टीम ला 51 जणांनी रक्तदान दिले या कार्यक्रमात सामाज अध्यक्ष सुधीर निकम यांनी प्रास्ताविक केले भरत सैंदाने यांनी सूत्रसंचालन केले.