510 मीटरपर्यंतचे डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी

0

धुळे। मोहाडी उपनगरात राज्य नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून मुख्य रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मालेगाव रोडवरील पाण्याची टाकी ते यशवंत कृषी माध्यमिक विद्यालयापर्यंत या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण 510 मीटर करण्याचे प्रस्तावित असतांना मात्र ह्या रस्त्याचे डांबरीकरण महापालिका अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे 260 मीटर एवढे करण्यात येत आहे.

याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. सदर रस्ता हा मोहाडी उपनगरात जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण 260 मीटर एवढे झाल्यास नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे. तसेच सदर रस्त्याचे 510 मीटरपर्यंतचे डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी केली आहे. काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर राजेश पवार, विकास धिंगाडे, देविदास गावडे, ज्ञानेश्‍वर ढेकळे, भाऊसाहेब शिंदे, भगवान देवरे, शाम गावडे, नंदू उचाळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.