जळगाव – जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील उमंग 2017 हे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात पार पडले. यावेळी समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, अंताक्षरी, पारंपारिक वेशभूषा, नाटक, रांगोळी, सारी व टाय डे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना चालना मिळावी, त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा, नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी यासाठी उमंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य प्रल्हाद खराटे यांनी सांगितले.
प्रसंगी सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सरस्वती स्तवन प्रा. कोमल तिवारी यांनी गायले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक प्रितम रायसोनी, संचालिका डॉ. प्रीती अगरवाल, प्रा.शमा पोतनीस, प्रा.सोनल तिवारी, प्रा.दीपक पाटील, प्रा.विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उमंग या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात देवा श्री गणेश वंदना या समूह नृत्याने करण्यात आली. तदनंतर मेरे सपनो की राणी कब आयेगी तू, तू ही तो जन्नत मेरी, मेरे कॉलेज की एक लडकी है, झिंगाट, तुझ मे रब दिखता है, बाजीराव मस्तानी, सोच न सके, बापू सेहत के लिये हानिकारक है अशा विवध विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला.
आयोजित स्पर्धेत अंताक्षरीत सात गटांनी सहभाग नोंदविला होता. यात अक्षर, धून, चित्रफित, आवाज ओळख फेरी, अशा पाच फे-या घेण्यात आल्यात. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चांगलाच रंग भरला. यावेळी आयोजित स्पर्धेत, समूह नृत्य -विजेता – हानिकारक समूह, एकल नृत्य -विजेता- भक्ती कुलकर्णी, उपविजेता – रोशनी वाटेकर, गीत गायन – विजेता विराज सोनी, नाटक – विजेता – बारावी सायन्स समूह, उपविजेता – अकरावी सायन्स समूह, अंताक्षरी – विजेता – दिवाने गट, उपविजेता – पैमाने गट यांना अनुक्रमे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी परीक्षक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यलय प्रमुख अनिल सोनार व जनसंपर्क अधिकारी अमोल बाविस्कर लाभले होते.
प्रसंगी सूत्रसंचालन तनिष ललवाणी व ऐश्वर्या पारपियानी यांनी केले तर कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा.संदीप पाटील, प्रा.पल्लवी भालेराव, प्रा.राखी वाघ व प्रा.नीलिमा वाकोडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.