52 वर्षीय प्रौढाने गळफास घेत केली आत्महत्या

Salbird’s Adult Suicide  मुक्ताईनगर : तालुक्यातील सालबर्डी येथील 52 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. संजय चिंधू लोमटे (52, सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. लोमटे यांनी शोभा विश्वनाथ खडसे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोमटे यांना रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.