जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन (धर्मनिरपेक्ष एकता दिन) निमित्त पक्षाच्या केंद्रीय सचिव कल्पना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी 9 ऑगस्ट 1942 च्या भारत छोडो आंदोलनाच्या इतिहासाचे व त्याप्रसंगी स्वातंत्र लढ्यासाठी बलिदान करणारे क्रांतीवीर व थोर राष्ट्रीय पुरुषांच्या केलेल्या कामगिरीबाबत सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन यांनी त्याच्या कार्यालया उजाळा देऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी देशभक्त क्रांतीवीर थोर राष्ट्रीय पुरुष यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पुष्पांजली अर्पण केली.
काँग्रेसतर्फे क्रांतीदिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली
काँग्रेस पक्षातर्फे क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव शहर जिल्हाध्यक्ष डॉ. भंगाळे यांच्याहस्तेे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.राधेश्याम चौधरी, वसंतराव सोनवणे, सेवादलाचे राजस कोतवाल, श्याम तायडे, कफिल शेख, ज्ञानेश्वर कोळी,दिपक सोनवणे, शैलैश पाटील, जगदिश गाढे, शशी तायडे, विष्णू घोडेस्वार, मनोज वाणी, दिवाकर कुलकर्णी आदि पदाधिकारी उपस्थित होते.