अन्न, वस्त्र, निवार्‍यांसोबत इंटरनेट चौथी गरज

0

जळगाव। मानवाला चहू बाजूने इंटरनेट महाजालने बंदिस्त केले आहे हे शास्वत सत्य आहे. मानवाची अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसोबतच इंटरनेट ही चौथी गरज बनली असल्याचे प्रतिपदान व्हीआयटी कॉलेज पुणे संगणक विभाग प्रमुख प्रा.डॉ.सचिन साखरे यांनी व्यक्त केले. ते जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंटमध्ये एम.सी.ए.विभाग व उ.म.वि. बीसीयुडीच्या सौजन्याने रिसेंट टे्रन्स इनोव्हेशन कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फोरमेशन टेक्नोलॉजी या प्रमुख विषयासह गुरूवार 2 फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. याप्रसंगी डीएनसीव्हीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे व सेन्ट्रोनिक्स कॉम्प्युटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सेठिया, डॉ.प्रिती अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांनी पाहिले कामकाज
परिषदेत संशोधकांनी ई.कॉमर्स, ई.गव्हर्नन्स, क्लाउड सर्विसेस, बिगडेटा – एप्लिकेशन आणि चेलेंजेस, आर्टीफिशल इंटेलिजन्स, डाटा वेअरहाऊझिंग अशा विविध विषयांवर शोध निबंध सादर करण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा.विजय गर्गे तर आभार प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले. परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा.रफिक शेख व प्रा.श्वेता फेगडे यांनी काम पहिले. यशस्वीतेसाठी प्रा.गौरव जैन, प्रा.भूषण राठी, प्रा.नीलम सोनार, प्रा.रुपाली ढाके आदींनी कामकाज पाहिले.

शोध निबंधांच्या सीडीचे प्रकाशन
डॉ. साखरे यांनी पुढे सांगितले की, जीवन जगताना पायाभूत सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. मानवाशी निगडीत कोणत्याही समस्येचे निराकरण करणारे साधन म्हणजे इंटरनेट आहे. इंटरनेट वापरासाठी उपयोगात आणली जाणारी संसाधनाच्या वापरात मानव अग्रेसर होत आहे. त्यामुळे इंटरनेट माध्यम हाच मानवी विचार आहे. दरम्यान, परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनी शोध निबंध सादर केलेत. त्याचबरोबर शोध निबंधांच्या सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ई-कॉमर्स वापरात अग्रेसर
समाजात होणार्‍या तांत्रिक अमुलाग्र बदलात प्रत्येकाला आपले योगदान देता यावे या हेतून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा उचललेला विडा विकसित व्हावा तसेच ई.कॉमर्समधील वापरात भारत अग्रेसर व्हावा यासाठी संशोधनपर परिषदेचे आयोजन करण्यात
आले होते.
व्यवसाय वाढीसाठी तंत्रज्ञानाची जोड
पुढे बोलतांना डॉ. साखरे म्हणाले की, मानवी जीवन रधारीने प्रगत होत आहे. मानवाला जवळपास 82 टक्के तंत्रज्ञान हाताळत आहे. हजारो डिव्हाईस एप्लिकेशन मानव हाताळत आहे त्यामुळे मानवाशी निगडीत सर्वच बाबी इंटरनेटशी जुळल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या सर्वत्र चर्चित असलेला विषय किंवा जोरदार काम सुरु असलेला प्रकल्प म्हणजे डीजीटल इंडिया आहे. डीजीटल होण्यासाठी मानवाला प्रगत तंत्रज्ञान अवगत करून घेणे महत्वाचे आहे. व्यवहारिक जीवन जगताना तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख सर्वांना असनेही गरजेचे आहे असे डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी सांगितले.

व्यवसाय वाढीसाठी तंत्रज्ञानाची जोड उद्योग क्षेत्रात भर घालणारी आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी व्यवसायिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे असे मत उद्योग क्षेत्रातील कार्यरत उमेश सेठिया यांनी व्यक्त केले.
रिसेंट टे्रन्स इनोव्हेशन कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फोरमेशन टेक्नोलॉजी या प्रमुख विषयांचा समावेश
– डाटा वेअरहाऊझिंग अशा विविध विषयांवर शोध निबंध सादर
– सेन्ट्रोनिक्स कॉम्प्युटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सेठिया, डॉ.प्रिती अगरवाल यांची उपस्थिती
– डीजीटल होण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान अवगत करून घेणे महत्वाचे