बोदवड : 14 व्या व 15 व्या वित्त आयोगात अपहार केल्या्रकरणी बोदवड
तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा आणि मुक्तळ या चार गावांचा कार्यभार असलेले तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांच्यासह शेलवडचे तत्कालीन सरपंच निलेश माळी यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बोदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
अपहाराचा पदाधिकार्यांवर ठपका
शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतींमध्ये 30 डिसेंबर 2018 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीदरम्यान तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी केलेल्या अनियमिततेबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र त्याची चौकशी न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार विभाग (ग्रामपंचायत) अधिकार्यांना निलंबित केले होते. यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून रविवारी सकाळी 14 व्या व 15व्या वित्त आयोगाच्या 52 लाख 94 हजार 180 हजार रुपये निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी तोतयेगिरी, ठगवणूक करून दस्तावेज बनावटीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहे.