53 हजाराचा गुटखा जप्त; धुळे एलसीबीची कारवाई

0

शिरपूर: धुळे शहरातील भंगार बाजार, 80 फुटी रस्त्यावरील अन्सार नगर भागात गुटख्याची चोरटी विक्री होत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन त्यांनी कारवाई करत 53 हजार 64 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धुळे येथील भंगार बाजार 80 फुटी रस्त्यावरील अन्सार नगर भागात जमीर रियाज तांबोळी हा गुटख्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना 2 मे 2020 रोजी मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत एका पत्र्याच्या शेडमध्ये 53 हजार 64 रुपयाचा गुटखा आढळून आला. हा मुद्देमाल पथकाने जप्त केला. तपास धुळे येथील अन्न औषध विभाग कारवाई करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई हनुमान उगले, पो.हे.काँ. रफिक पठाण, पो.ना. गौतम सपकाळे, पो.काँ.राहुल सानप, चालक विलास पाटील आदींनी केली.