मारहाण प्रकरणी वकिलांचा बंद

0

पुणे । शिवाजीनगर न्यायालय परिसरात ज्येष्ठ वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे बार असोसिएशने येत्या सोमवारी (दि. 14) बंद पुकारला आहे. सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी दिली. बुधवारी ज्येष्ठ वकील राजेंद्र विटणकर यांना काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी मारहाण केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे न्यायालयात पडसाद उमटले.