जळगाव । नाशिक पदवीधर मतदारसंघा अतंर्गत विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी मतदान शहरातील आर.आर.विद्यालय व भा.का.लाठी विद्यालयामध्ये 7 मतदान केंद्र असून येथे सकाळपासून मतदानाला सुरुवात करून मंदगतीने मतदान होतांना दिसून आले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण 17 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 41 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यानिवडणुकीत 58.1 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 34 हजार 442 मतदारांपैकी 19 हजार 979 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यात पुरुष 15 हजार 730 तर 4 हजार 249 महिला मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदानाची नोंद बोदवड तालुक्यात 71.48 टक्के तर सर्वात कमी मतदानाची नोंद जळगाव तालुक्यात 49.36 टक्के एवढी झाली.
तालुकानिहाय मतदानाची (टक्केवारी)
बोदवड 71.48, रावेर 71.31, धरणगाव 70.08, मुक्ताईनगर 68.74, भुसावळ 62.19, चोपडा 62.11, यावल 61.77, एरंडोल 60.00, अमळनेर 59.09, पारोळा 58.68, भडगाव 56.70, जामनेर 55.96, पाचोरा 55.56, चाळीसगाव 52.96, जळगाव 49.36 टक्के अशी तालुकानिहाय मतदानाची नोंद झाली. मतदानासाठी जिल्ह्यात 318 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व 17 केंद्रांवर 41 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.