पुणे । आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रवींद्र तळपे यांना एकाच कार्यक्रमात चार वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापालिकेबरोबरच 512 आर्मी बेस वर्कशॉप, आयआयटी मुंबई व महाराष्ट्रातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने तळपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार तळपे यांनी आदिवासी आश्रमशाळांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या माझ्या हजारो छोट्या बांधवांना व शेकडो कुमारीमातांना समर्पित केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र योजना, आदिवासी आश्रमशाळा मृत्यू प्रकरण, आदिवासी वसतीगृह 11 नोव्हेंबर, 2011चा शासननिर्णय अंमलबजावणी, 2001 जातपडताळणी केंद्र शासनाच्या कर्मचार्यांना लागू करणे, धनगर आरक्षण, मेडिकल अॅडमिशनमधील घुसखोरी, बोगस आदिवासींविरुद्ध अनेक प्रकरणे, कुमारीमाता समस्या अशा विविध प्रकरणी याचिका दाखल करून दुर्बल समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आदिवासी कार्यकर्ते तळपे यांनी केला आहे.