शिंदखेडा । नोव्हेंबर अखेर होवू घातलेल्या शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये सतरापैकी पाच जागांवर मनसेतर्फे उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाच्या शहरातील व तालूक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच गटनेते अनिल वानखेडे यांच्या गटासोबत यूती करण्याचे संकेत बैठकित देण्यात आले. शिंदखेडा नगरपंचायतीची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. निवडणूकीसाठी शहरात वातावरण चांगलेच तापू लागले. विवीध राजकिय पक्ष, गट, इच्छुकांच्या समर्थकांच्या बैठका होत असून आगामी निवडणूकीची व्यूव्हरचना आखली जात आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी कोणाला द्यावी हा प्रश्न प्रत्येक राजकीय पक्षांच्या गटनेत्यांसमोर असेल.
कोणताही परिणाम नाही
शहरात विद्यामान नगरसेविका सुषमा चौधरी यांचे पती व माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक चौधरी यांच्या रूपाने मनसेची ताकद नगरपंचायतीत होती. परंतू त्यांनीही यापूर्वीच भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. मात्र चौधरी यांच्या जाण्याने कोणताही परीणाम पक्ष संघटन व ताकदीवर होणार नाही. या उलट येत्या नगरपंचायत निवडणूकीत पक्ष अधिक यश मिळवेल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे यांनी दिली. आपसातील मतभेद बाजूला ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन मोरे यांनी केले. कार्यकर्त्यांना निवडणुकींसाठी सज्ज राहण्याचेही यावेळी मोरे यांनी सांगितले. जून्या विश्राम गृहामध्ये झालेल्या या बैठकीस जिल्हाउपाध्यक्ष अनिल सिसोदे, स्वप्निल सोनार, तालूकाउपाध्यक्ष दरबारसिंग बागुल, शहरउपाध्यक्ष यादव मराठे, गोपाल मराठे, कुणाल चौधरी, सचिन बडगुजर, अक्षय मोरे, मुन्ना मराठे, अमोल बडगुजर, काशिनाथ लोहार आदि उपस्थित होते. प्रास्ताविक बबनराव भामरे, सुत्रसंचालन व आभार यादव मराठे यांनी केले.