लग्नाच्या आमिषाने तोतया पोलिसाचा महिलेवर बलात्कार

0

निगडी : लग्नाचे आमिष दाखवून एका तोतया पोलिसाने चिंचवडच्या महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्याकडून सव्वादोन लाख रुपयेदेखील लुबाडले. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बलात्कार करणार्‍यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निलकुमार शहाजी थोरात (वय 27, रा. आळंदी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. निगडी पोलिसांनी स्वप्निलकुमार याला अटक केली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिची स्वप्निलकुमार याच्याशी ओळख झाली. त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी करून लग्नाचे आमिष दाखवले. वेळोवेळी बलात्कार केला. तसेच दोन लाख 15 हजार रुपयेदेखील लुबाडले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून स्वप्निलकुमार थोरात याच्याविरुद्ध फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.