55 कर्मचार्यांना कोरोनाची बाधा
भुसावळातील डीआरएम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव : वर्क फ्रॉम होमचा पर्याय
भुसावळ : रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात सलग दोन दिवसात 45 कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. सतत एक-दोन कर्मचारी बाधीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी व गुरुवरी कोरोना तपासणी शिबिर डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घेण्यात आले. पहिल्या दिवशी बुधवारी 171 पैकी 31 कर्मचार्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर दुसर्या दिवशी गुरूवारी 125 पैकी 24 कर्मचार्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर डीआरएम कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसात 55 कर्मचारी निघाले बाधीत
कर्मचारी पॉझीटीव्ह येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी 11 वाजेपासून डीआरएम कार्यालयातील आतील प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. विविध विभागातील 171 कर्मचार्यांचे बुधवारी स्वॅब घेतल्यानंतर त्यात 31 कर्मचार्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर गुरुवारीदेखील सकाळ सत्रात घेण्यात आलेल्या शिबिरात 125 पैकी 24 कर्मचार्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने डीआरएम कार्यालयातील कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. तीन ते चार दिवस दररोज डीआरएम कार्यालयात स्वॅब तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. यामुळे डीआरएम कार्यालयात सर्वच कर्मचार्यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. कर्मचार्यांसोबत अधिकारी, वरीष्ठ अधिकारी यांचीही तपासणी केली जाणार आहे.
तीन शिफ्टमध्ये कामे
डीआरएम कार्यालयातील कर्मचार्यांना त्यांची कामे तीन शिफ्टमध्ये विभागून दिली आहे. यात 7 ते 12, 1 ते 6 व महिलांसाठी 10 ते 4 अश्या तीन वेगवेगळ्या शिफ्ट ठरवून दिल्या आहे. ही अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे. वर्कफॉर्म होम केले जाणार आहे. काही पॉझीटीव्ह कर्मचारी रेल्वे हॉस्पीटल तर काही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. बाधीतांमध्ये लिपीक, स्टेनोसह शिपायाचा समावेश आहे.