55 वर्षीय प्रौढ भुसावळातून बेपत्ता

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी भागातील 55 वर्षीय प्रौढ इसत्ता बेपत्तत्त झाल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली. सुदामा गोविंदराम अघीचा (55, सुनील ऑईल मिलजवळ, सिंधी कॉलनी भुसावळ) हे 2 रोजी रात्री अचानक घरातून बेपत्ता झाले. सर्वत्र शोधाशोध घेवूनही ते न आढळल्याने या प्रकरणी राजकुमार गोविंदराम अघीचा (67, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद केली.