यावल : अवैधरित्या सागवान लाकूड घरात साठवून ठेवले असल्याची गुप्त माहिती यावल वनविभागाच्या गस्ती पथकाला मिळाल्यानंतर चोपडा तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी रोहिदास रतन कोळी यांच्या घराची झडती घेतल्यानंतर 55 हजार रुपये किंमतीचा अवैध सागवानी लाकडाद्वारे तयार केलेला कॉट व अंजनाचे टिपरे जप्त करण्यात आले. आरोपी मात्र पसार झाला.
ही कारवाई गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, चोपडा वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील, लासूर वनपाल प्रतिभा सोनवणे, वनरक्षक जगदीश ठाकरे, शिवाजी माळी, संदीप पाटील, सुनिता पाटील, योगीराज पाटील यांच्या पथकाने केली.