पिंपरी-चिंचवड : निगडी येथील उड्डाण पुलावर एका तरुणाचा दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झाला. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास उघडकीस आली. शंकर किसन झेंडे (वय 39 रा.बापूजी मंदिरा शेजारी निगडी) असे त्याचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलावर एकजण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची खबर निगडी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याची अॅॅक्टिव्हा दुचाकी एका बाजूने पूर्णपणे घासलेल्या अवस्थेत रस्त्याच्या एका बाजूला पडली होती. पुलाच्या कठड्यावर त्याचे डोके आपटल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. पोलिसांनी त्या इसमाला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.