पुणे । अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करणार्या 22 वर्षीय तरुणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एन. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. किरण चंद्रकांत ओव्हाळ असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 7 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 9 ते 11.30 या कालावधीत घडली. त्या मुलीचे आई-वडिल कामाला गेले होते.
त्यावेळी ओव्हाळने घरात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. ओव्हाळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. जामिन मिळाल्यास ओव्हाळ त्या मुलीच्या कुटुंबियांना धमकावण्याची शक्यता आहे. यासाठी त्याचा जामिन फेटाळावा, असा अॅड. पाठक यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ओव्हाळ याचा जामिन फेटाळला.