पुणे । देशभरात स्वदेशीचा नारा दिला जात असताना अॅप क्षेत्रातही क्रांती करत व्हॉटस अॅपला टक्कर देणारे पहिले ‘टॉकबिज’ स्वदेशी अॅप बिबेवाडीमधील तरुणाने विकसित केले आहे. या अॅपमध्ये फेसबुकपासून इतर सर्व अॅप एकत्रित मिळणार आहेत. हे अॅप बेरोजगारांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत ‘टॉकबिज’ या स्वदेशी अॅपला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून एका महिन्यात 50 हजारहून अधिक नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
याविषयी माहिती देताना अॅप विकसित करणारे पंकज साळुंखे म्हणाले की, सोशल नेटवर्किंग साईटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज वस्तूंचा वापर केला जात आहे. तर, दुसरीकडे जगभरात स्वदेशीचा नारा दिला जात आहे. मात्र स्वदेशीचे अॅप, साहित्य कोणीच विकसित करत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडियाचा’ नारा दिला असल्याने त्यातून मी प्रेरणा घेऊन काहीतरी स्वदेशी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या अॅपमध्ये आपल्याला चॅटिंगसोबतच नोकरीची संधी देखील पाहता येणार आहे किंवा एखाद्या कंपनीला मनुष्यबळाची गरज असल्यास त्यांना या अॅपद्वारे मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तीन वर्षांपासून मी हे अॅप बनवू शकलो नाही. पण इच्छा शांत बसू देत नव्हती. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करत मागील महिन्यात अॅप बनवल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात हे अॅप प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध केले असून आत्तापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले. अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन tokbizअसे टाईप केल्यास लगेच अॅपचे साईन दर्शवेल तेथून तुम्ही हे डाऊनलोज करू शकता.
काय आहेत अॅपचे वैशिष्ट्य
हे अॅप व्हॉटस अॅपच्या सर्व फॅसिलिटी तर देतेच पण त्याबरोबर तरुण पिढीची गरज ओळखून त्यात बर्याच नवीन गोष्टीही अॅड करण्यात आल्या आहेत :
तुम्हाला आलेला वर्ड मॅसेजही तुम्ही ऐकू शकता. मॅसेजच्या खाली एक बटन असेल त्या बटनला दाबले असता तो एसएमएस वर्ड टू व्हॉईस कनव्हर्ट होतो.
मॅसेज शेड्युल्ड करता येणार आहेत. उद्या एखाद्याला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री ठीक 12.00 वाजता द्यायच्या आहेत. तर त्याचा एसएमएस तुम्ही टाईप करून त्याला पाठविण्याचा टाईम सेट करा तो एसएमएस त्याला ठीक बारा वाजता पोहचेल. त्यासाठी तुम्ही जागे राहण्याची गरज नाही.
एखाद्या तरुणाने त्याचे ज्ञान देशाच्या तंत्रज्ञानात भर पाडण्यासाठी वापरले ही खरीच कौतुकास्पद गोष्ट आहे. स्वदेशी आधुनिक अॅप असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. याला तरुण वर्गात कशी पसंती मिळते हे येणारा काळच ठरवेल!