राज्यात करोनाचे ५६९ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी ५६९ नवे रुग्ण सापडले. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ८७४ झाली आहे. तर, दोन बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यातील एक रुग्ण मुंबईतील आहे.राज्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ४६ हजार ८७० झाली’ तसेच बुधवारी दोन बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४५१ झाली.