त्रिशा कारखानीसचे सुवर्णपदकांसह नवीन विक्रम

0

मुंबई । मुलुंड जिमखान्याच्या त्रिशा कारखानीसनेे बृहन्मुंबई जलतरण संघटना आयोजित ज्युनिअर गटाच्या निवड चाचणी जलतरण स्पर्धेतील महिलांच्या गटात 100 मीटर बॅक स्ट्रोक आणि 100 मीटर बटरफ्लाय शर्यतीत नवीन विक्रम नोंदवत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. त्रिशाने 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात 1मिनीट 11:98 सेकंदचा नवीन स्पर्धा विक्रम नोंदवला. या शर्यतीत ऑट्टर्स क्लबची मुस्कान तोलानी (1 मिनीट 20:23 सेकंद) आणि जीएईटीच्या दुर्वा रेडकरने 1 मिनीट 24:29 सेकंदासह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.

त्रिशाने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1मिनीट 5:28 सेकंद अशा कमागिरीसह नवीन उच्चांकासह सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत जीएससीची राधिका गावडे ( 1 मिनीटे 16:77 सेकंद) आणि ज्योती पाटील (पीएसपी) 2 मिनीटे 57:60 सेकंद अशा कामगिरीसह अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहिल्या.