रावेर । कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आचारसंहिता असल्याने खरेदी-विक्री संघ व्यवस्थापक विनोद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील उटखेडा रोडवरील वखार महामंडळ येथे मार्केेटतर्फे आयोजित कार्यक्रमात उद्घाटन संपन्न झाले. तूर खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी याआधी सभापती, उपसभापती, सचिव यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर शासनाने मान्यता देवून खरेदी केेंद्र सुरु करण्याची परवानगी दिली.
शेतकर्यांना मिळाला आधार
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती डॉ. राजेंद्र पाटील, उपसभापती प्रमोद धनके, संचालक डॉ. सुभाष पाटील, पितांबर पाटील, निळकंठ चौधरी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जिजाबराव पाटील, संचालक सुर्यभान चौधरी, किशोर पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत पाटील, राजेंद्र लासुरकर, संतोष तायडे, लक्ष्मण मोपारी, सय्यद खालिद आदी उपस्थित होते. सध्या शेतकर्यांना तूर खाजगी व्यापार्यांना 3 हजार 500 ते 4 हजार रुपये किंमतीने विकावे लागत आहे. परंतु मार्केट कमिटीने तूर खरेदी केंद्र सुरु केल्यानेे शेतकर्यांना एक प्रकारचे आधार मिळाला आहे. शासनातर्फे तुरी 5 हजार 50 चा भाव असून यापुढे तरी शासनाला द्यावे असे मान्यवरांनी सांगितले.
खाजगी व्यापार्यांना कमी भावात देण्यापेक्षा बाजार समितीने सुरु केलेले तूर खरेदी केंद्रावर द्यावे. शासनाचा 5 हजार 500 भाव असून यामुळे शेतकर्याला क्विंटल मागे 1 हजार 400 च्याजवळपास शेतकर्यांना फायदा होणार आहे. खरेदी केंद्र सुरु व्हावी यासाठी आम्ही लक्ष घालून पाठपुरावा करुन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
– प्रमोद धनके, उपसभापती