57 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत केली आत्महत्या

An adult farmer of Nandgaon committed suicide by hanging himself एरंडोल : तालुक्यातील नंदगाव येथील दिलीप कथ्थू पाटील (57) यांनी मंगळवारी पहाटे घराच्या बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. ज्ञानेश्वर कथ्थू पाटील यांनी या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मृत शेतकर्‍याने आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास नंदगाव येथे मयत शेतकर्‍यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातु, चार भाऊ असा परीवार आहे. याबाबत अनिल पाटील, जुबेर खाटीक, राजेश पाटील, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहे.